पवारांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षातंर्गत हा विषय; काँग्रेस नेत्याची प्रतिक्रीया

पवारांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षातंर्गत हा विषय; काँग्रेस नेत्याची प्रतिक्रीया

| Updated on: May 03, 2023 | 8:07 AM

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले पवार यांनी पवार यांच्या राजीनाम्याबाबत म्हणाले की, शरद पवार यांनी राजीनामा का दिला, हे सांगणे कठीण आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (२ मे) पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये ही घोषणा केली. पवारांच्या राजीनाम्याबाबत आता सर्व राजकीय नेते प्रतिक्रीया देत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले पवार यांनी पवार यांच्या राजीनाम्याबाबत म्हणाले की, शरद पवार यांनी राजीनामा का दिला, हे सांगणे कठीण आहे, ते शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक आणि राजकीय जीवनात राहतील आणि सदैव एका विचारधारेने लढतील. पण हा त्यांच्या पक्षातंर्गत हा विषय आहे. तर पवार यांनी स्वत: त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे यावर फार बोलावं असं आपल्याला वाटत नाही असेही पटोले म्हणाले. त्याचबरोबर त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही, असे नाना पटोले म्हणाले. तर आम्हाला त्यांचे मार्गदर्शन मिळत राहील आणि महाविकास आघाडी चांगली चालेल अशी अपेक्षा ही पटोले यांनी व्यक्त केली.

Published on: May 03, 2023 08:07 AM