Sharad Pawar | ‘बृजभूषण सिंह यांचा वाद महाराष्ट्राविरोधातील नाही’
एखाद्या राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या आणि त्याला विरुद्ध बाजूनी प्रतिक्रिया आली तर ती प्रतिक्रिया त्या व्यक्तीच्या विरोधात असते. ज्यांच्याकडून ही विरोधी प्रतिकिया आले ते आमचे संसदेतील सहकारी आहेत, असे शरद पवार म्हणाले.
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जूनमध्ये अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना जोरदार विरोध दर्शवला आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा महाराष्ट्र विरोधात वाद आहे असं नाही, तर एका व्यक्ती विरोधात आहे. एखाद्या राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या आणि त्याला विरुद्ध बाजूनी प्रतिक्रिया आली तर ती प्रतिक्रिया त्या व्यक्तीच्या विरोधात असते. ज्यांच्याकडून ही विरोधी प्रतिकिया आले ते आमचे संसदेतील सहकारी आहेत, असे शरद पवार म्हणाले.
Published on: May 12, 2022 10:04 PM
Latest Videos