पुण्यात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन, श्वानाच्या तोंडावर भाजप नेत्यांचे फोटो लावत केले आंदोलन!
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुधीर मुनगंटीवार आणि गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आंदोलन सुरु आहेत. दरम्यान एक वेगळं आंदोलन पुण्यात करण्यात आलं आहे.
पुणे : भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुधीर मुनगंटीवार आणि गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आंदोलनं सुरु आहेत. दरम्यान एक वेगळं आंदोलन पुण्यात करण्यात आलं आहे. पुण्यात गोपीचंद पडळकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधाक पोस्टरबाजी करण्यात आली आहे. श्वानाच्या तोंडावर दोघांचे फोटो लावत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे. शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर राष्ट्रवादीकडून अशा स्वरुपात निषेध करण्यात आला आहे.
Published on: Jun 08, 2023 09:51 AM
Latest Videos