देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

“देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा”, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

| Updated on: Jun 29, 2023 | 1:52 PM

पुण्यात महिलांवर सतत होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस बुधवारी आक्रमक झालेली पाहायला मिळाली. पुण्यातील गुडलक चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे राज्य सरकार आणि गृह खात्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं.

पुणे : पुण्यात महिलांवर सतत होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस बुधवारी आक्रमक झालेली पाहायला मिळाली. पुण्यातील गुडलक चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे राज्य सरकार आणि गृह खात्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. पुणे शहरात वारंवार महिलांवर आणि मुलींवर हल्ले होत असताना राज्याचं गृहखातं करताय काय? असा सवाल या आंदोलनकर्त्या महिलांनी सरकारला केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारला महिलांचे काहीच पडलं नाही असा आरोप राज्य सरकार आणि गृह खात्यावर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा तरच महिला सुरक्षित राहतील, अशा घोषणाबाजी देखील या महिला कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाहायला मिळाल्या. “जागे व्हा, जागे व्हा, कुंभकर्णासारखे झोपलेले गृहमंत्री जागे व्हा” अशा आशयाचे फलक यावेळी दाखवण्यात आले.

Published on: Jun 29, 2023 01:52 PM