आधी 500 कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप, आता जप्तीची कारवाई? राहुल कुल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

आधी 500 कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप, आता जप्तीची कारवाई? राहुल कुल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

| Updated on: Mar 13, 2023 | 1:25 PM

MLA Rahul Kool : भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर राहुल कुल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाहा व्हीडिओ...

पुणे : भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आमदार राहुल कुल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ही कारवाई होऊ शकते. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष आणि संचालक रमेश थोरात यांनी याविषयी माहिती दिली आहे. “जिल्हा बँकेचं जवळपास 200 कोटीपर्यंतचं कर्ज थकलं आहे. आम्ही आतापर्यंत दोनवेळा नोटीसा दिल्या आहेत. राज्य बँकेनं सांगितलं आहे की, तुमची रक्कम मोठी आहे. तुम्ही कारवाई करा. त्यामुळे आम्ही आता कायद्यानुसार कारवाई करणार आहोत”, असं रमेश थोरात यांनी सागितलं आहे. त्यामुळे राहुल कुल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Published on: Mar 13, 2023 01:25 PM