प्रभू श्रीरामाबद्दल आस्था नसलं; फडणवीस यांचा पवारांवर हल्लाबोल

प्रभू श्रीरामाबद्दल आस्था नसलं; फडणवीस यांचा पवारांवर हल्लाबोल

| Updated on: Apr 09, 2023 | 1:50 PM

राज्यात अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात सापडला असताना मुख्यमंत्री मंत्रिमंडळासह अयोध्या दौऱ्यावर गेले अशी टीका त्यांनी केली. पवार यांच्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे

अयोध्या : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन आज जोरदार टीका केली. राज्यात अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात सापडला असताना मुख्यमंत्री मंत्रिमंडळासह अयोध्या दौऱ्यावर गेले अशी टीका त्यांनी केली. पवार यांच्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी, टीका करणं हे विरोधकांच काम असल्याचे म्हटलं आहे. तर त्यांची आस्था नसेल पण प्रभू श्रीराम ही आमची आस्था आहे. आणि प्रभू श्रीराम हे एख अस व्यक्तिमत्व आहे की, ज्यांनी राज्यकारभार कसा करावा हे आपल्याला सांगितलं. गांधीजींची संकल्पनाही रामराज्याचीच होती. मग जर रामराज्याची संकल्पना राबवायची असेल तर रामाचं दर्शन तर घेतलंच पाहिजे असा टोला त्यांनी लगावला आहे.

Published on: Apr 09, 2023 01:50 PM