Sharad Pawar : पवारांची राजकारणातून निवृत्ती? म्हणाले, ’14 निवडणुका लढल्या, तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता…’

| Updated on: Nov 05, 2024 | 5:20 PM

राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्यानंतर एकच रणधुमाळी पाहायला मिळत आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना रंगताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना महायुती आणि मविआच्या बड्या नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका सुरू केला आहे, अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत देण्यात आले आहेत. १४ निवडणुका लढल्या तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही, असं शरद पवार यांनी जनतेसमोर म्हटलं. बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांची प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेत शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. ‘मी खात्री एवढीच देऊ इच्छितो, मी सत्तेमध्ये नाही… राज्यसभेत आहे. अजून माझे दीड वर्ष आहे. दीड वर्षांनंतर पुन्हा राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कोणतीही निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका करायच्या. आतापर्यंत १४ निवडणुका केल्या. तुम्ही असले लोक आहात एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडून देत आहात. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे. नवी पिढी समोर आली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलो आहे.’, असं शरद पवार म्हणाले.

Published on: Nov 05, 2024 05:20 PM
Saroj Ahire : ‘माझ्या विरोधात षडयंत्र अन्…’, अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे यांच्या डोळ्यात पाणी
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न, कारण नेमकं काय?