शिवरायांच्या वाघनखांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादादरम्यान शरद पवार स्पष्टच म्हणाले…
VIDEO | छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं 16 नोव्हेंबर रोजी भारतात तीन वर्षांकरता परत आणण्यात येणार असल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शिवरायांच्या वाघनखांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादादरम्यान शरद पवार यांनी काय केलं भाष्य?
पुणे, १ ऑक्टोबर २०२३ | शिवरायांची वाघनखं लंडनहून परत आणण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार रविवारी ब्रिटन येथे जाणार आहे. तर यासंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं 16 नोव्हेंबर रोजी भारतात तीन वर्षांकरता परत आणण्यात येणार आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांवरून राजकीय वर्तुळात चांगलेच आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आणि आदित्य ठाकरे यांनी ब्रिटनच्या वस्तुसंग्रहालयात असणारी वाघनखंही शिवरायांची नसल्याचा दावा केला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी यावर भाष्य केले आहे. रविवारी जुन्नर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना शिवरायांच्या वाघनखांवरून वाद निर्माण करावा, असे मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. पवार म्हणाले, मराठी भाषेतील इतिहासाचे जाणकार इंद्रजित सावंत हे आहेत. त्यांचं काही मत असेल तर त्याचा विचार केला पाहिजे. पण वाघनखांविषयी मला प्रत्यक्ष काहीही माहिती नाही.