...फक्त त्यांनी मुद्दे चांगले मांडावेत भाषा शिवराळ वापरू नये; अजित पवारांना कोणी दिला असा सल्ला

…फक्त त्यांनी मुद्दे चांगले मांडावेत भाषा शिवराळ वापरू नये; अजित पवारांना कोणी दिला असा सल्ला

| Updated on: May 10, 2023 | 3:00 PM

तर अजित पवार यांनी फक्त शिंदेंची मिमिक्री केली नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकरी जनतेची चेष्टा केल्याचं म्हटलं आहे.

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे स्वर्गीय कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त सातारा दौऱ्यावर होते. त्यावेळी झालेल्या सभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर जात टीका केली होती. तर त्यांची मिमिक्री देखील केली. त्यावरून शिंदे गटाकडून आता टीका होताना दिसत आहे. याचमुद्द्यावरून आमदार शहाजीबापू पाटील यांनी अजित पवार यांना सुनावले आहे. तसेच आपलंही त्यांच्यावर प्रेम आहे. फक्त त्यांनी मुद्दे चांगले मांडावेत मात्र भाषा शिवराळ वापरू नये असा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर शहाजीबापू पाटील यांनी जुना एक किस्सा सांगत त्यांना स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधीवर पापक्षालनला बसावं लागलं होतं असं म्हटलं आहे. तर अजित पवार हे जेष्ठ नेते आहेत, त्यांनी टिंगल टवाळ्या करणं हे राज्याच्या राजकारणाच्या संस्कृतीला शोभणारं नाही. तर अजित पवार यांनी फक्त शिंदेंची मिमिक्री केली नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकरी जनतेची चेष्टा केल्याचं म्हटलं आहे.

Published on: May 10, 2023 03:00 PM