शरद पवार यांनी राजीनामा का दिला? कोणचा हेतू?; खडसेंनी उठवला पडदा

शरद पवार यांनी राजीनामा का दिला? कोणचा हेतू?; खडसेंनी उठवला पडदा

| Updated on: May 05, 2023 | 10:36 AM

यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांनी स्वतःहून ती इच्छा व्यक्त केली होती. तर राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोक माझा सांगाती या पुस्तक प्रकाशनामध्ये आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्यावरून राष्ट्रवादीत नाराजी दिसत आहे. तर त्यांनी हे पाऊल अजित पवार आणि राष्ट्रवादीतला एक गट भाजपमध्ये जाणार होता त्यामुळे उचचल्याचे दैनिक सामानात म्हटलं आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांनी स्वतःहून ती इच्छा व्यक्त केली होती. तर राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. या कारणामुळे कार्यकर्त्यांमध्ये व राजकारणामुळे उलथापालट झाल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर पवार म्हणजे असे व्यक्तिमत्व आहे की, ज्याचे गुड अजूनही अनेकांना उकळता आलेले नाही आणि समजले नाही. नेमकं पवार यांनी हा राजीनामा कशासाठी दिला. कोणचा हेतू त्याच्यामागे आहे. पुढचे परिणाम काय होतील? याबाबत आज सांगता येणार नाही असेही ते म्हणाले. तर आपल्यासह अनेकांची एकच इच्छा आहे की तेच अध्यक्ष राहिले पाहिजे.