शरद पवारांवर बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याची जीभ घसरली, म्हणाला 'लायकीत रहावं'

शरद पवारांवर बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याची जीभ घसरली, म्हणाला ‘लायकीत रहावं’

| Updated on: Jun 15, 2023 | 3:24 PM

पवार यांनी राज्यात भाकरी फिरवलीच असे बोलले जात आहे. तर अजित पवार यांना डावल्याची टीका ही होत आहे. यावरून शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी शरद पवार यांनी भाकरी फिरवली तरी आम्हाला काही फरक पडत नाही.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर पवार यांनी राज्यात भाकरी फिरवलीच असे बोलले जात आहे. तर अजित पवार यांना डावल्याची टीका ही होत आहे. यावरून शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी शरद पवार यांनी भाकरी फिरवली तरी आम्हाला काही फरक पडत नाही. तर त्यांच्या राष्ट्रीय पक्षाचीच मान्यता आता काढून घेण्यात आली आहे. त्यामुळं कसलं राष्ट्रीय अध्यक्ष? आणि सुप्रिया सुळे याचं कसलं आव्हान? तर त्यांच्या पक्षाकडे राज्यात 54 एक आमदार तर 3 ते 4 खासदार आहेत. तर भाजपकडे 305 खासदार आणि 3500 आमदार त्यामुळं लायकीत रहावं असं त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jun 15, 2023 03:24 PM