पवार यांच्या दौऱ्यावर शिंदे गटाच्या नेत्याचा निशाना, म्हणाला, ‘त्याचा काही परिणाम होणार?’
याचपार्श्वभूमिवर शरद पवार यांनी राज्याचा दौरा आखला आहे. तर ते आता दौऱ्यावर बाहेर पडले असून त्यांनी पहिली सभा नाशिकच्या येवल्यात घेतली. येवला हा छगन भूजबळ यांचा बालेकिल्ला मानला जातो.
सांगोला : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फूटीने शरद पवार चांगलेच घायाळ झाले आहेत. त्यानंतर त्यांनी ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्याविरोधात आता रणशिंग फुंकले आहे. याचपार्श्वभूमिवर शरद पवार यांनी राज्याचा दौरा आखला आहे. तर ते आता दौऱ्यावर बाहेर पडले असून त्यांनी पहिली सभा नाशिकच्या येवल्यात घेतली. येवला हा छगन भूजबळ यांचा बालेकिल्ला मानला जातो. तर या वयात शरद पवार हे राष्ट्रवादीच्या बांधणीसाठी निघाल्याने त्यांना लोकांची सहानुभूती मिळत आहे. त्याचा परिणाम अजित पवार आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारंवर होईल असे काही राजकीय जानकार मानतात. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते सांगोल्याचे आमदार शाहजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, पवार यांच्या सभांचा परिणाम नेमका काय होईल आजच सांगणं कठीण आहे. पण जे अजित दादांबरोबर आलेले आमदार आहेत, ते आपआपल्या मतदारसंघात ताकदवाण असलेली लोक आहेत. त्यांची आपल्या मतदारसंघात राजकीय पकड घट्ट आहे. त्यामुळे त्याचा फार परिणाम होणार नाही. एक भावनिक युद्ध होईल आणि पुन्हा राजकारण मूळ वातावरणात चालत राहिल असं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.