अध्यक्ष निवडीवर सध्या बोलणं उचीत नाही; राऊत यांची राष्ट्रवादीवर सावध प्रतिक्रीया

अध्यक्ष निवडीवर सध्या बोलणं उचीत नाही; राऊत यांची राष्ट्रवादीवर सावध प्रतिक्रीया

| Updated on: May 04, 2023 | 8:25 AM

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत असल्याचं शरद पवारांनी जाहीर करताच राष्ट्रवादीसह राज्याच्या राजकारणात भूकंप आला. त्यावरून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यानंतर एक मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय पवारांनी यावेळी जाहीर केला. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत असल्याचं शरद पवारांनी जाहीर करताच राष्ट्रवादीसह राज्याच्या राजकारणात भूकंप आला. त्यावरून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी देखिल याच्याआधी ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, भाकरी फिरवण्याचे संकेत होते. पण तवाच फिरवला. त्यानंतर आता यावर बेळगावमध्ये प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सध्या ज्या घडामोडी घडत आहेत. त्यावर बोलणं उचीत नाही. हा त्यांच्या पक्षातल्या अंतर्गत बाबी आहेत. तर शरद पवार हे सर्वोच्च नेते आहेत. ते निर्णय घेतील. तर आम्ही त्यावर मत व्यक्त करणं, भूमिका घेणे हे बरोबर नाही. पवार हे जाणकार आणि अनुभवी आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या देशाच्या हिताचा निर्णय घेतील याची खात्री आहे.