शरद पवारांच्या पॉवर प्लेत अजित पवार आडकले; बैठकीला हजर, मात्र असं काय झालं की?

शरद पवारांच्या पॉवर प्लेत अजित पवार आडकले; बैठकीला हजर, मात्र असं काय झालं की?

| Updated on: May 06, 2023 | 7:46 AM

शरद पवार यांनाही पत्रकार परिषदेवेळी यावेळी प्रश्न विचारण्यात आले. पण इथे कोण उपस्थित आहे किंवा नाही यावरुन वेगळा अर्थ काढू नका, असं शरद पवार यांनी पत्रकारांना आवाहन केलं.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यांच्या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे पुन्हा विविध चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांनाही पत्रकार परिषदेवेळी यावेळी प्रश्न विचारण्यात आले. पण इथे कोण उपस्थित आहे किंवा नाही यावरुन वेगळा अर्थ काढू नका, असं शरद पवार यांनी पत्रकारांना आवाहन केलं. पण त्यानंतरही अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला. त्याचदरम्यान अजित पवार यांनी मी दिल्ली गेल्याच्या बातम्या तथ्यहीन असल्याचं म्हटलं. याच्याआधी अजित पवार हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना उत आला होता. मात्र शरद पवार यांच्या पॉवर प्लेने भाजपसह अजित पवार यांच्या मनसुभ्यावर पाणी फेरण्यासह इशारा देण्याचे काम केल्याचं बोललं जात आहे. त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट