पवार यांनी राजीनामा देताच राज्यात भाजपच्या मोठ्या नेत्याची एंन्ट्री; नार्वेकरांची भेटीचे गौडबंगाल काय?
गेल्या दिड एक महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर तीन वेळा येऊन गेले. त्यांच्या पाठोपाठ आता आणखी एका केंद्रीय मंत्र्याने राज्यात पाऊल ठेवलं आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उत आला आहे.
मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. तर नवा अध्यक्ष निवडीवर आता 5 मे रोजी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटिची बैठक होणार आहे. तर दरम्यान राज्यातील 16 आमदार अपात्रतेचा निकाल ही येण्याची शक्यता आहे. यादरम्यान भाजपने देखील आपल्या हलचाली वाढवल्या आहेत. गेल्या दिड एक महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर तीन वेळा येऊन गेले. त्यांच्या पाठोपाठ आता आणखी एका केंद्रीय मंत्र्याने राज्यात पाऊल ठेवलं आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उत आला आहे. केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू हे सध्या महाराष्ट्रातील घडामोंडीवर लक्ष ठेवून असल्याचे दिसत आहे. त्यांनी मुंबईत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यांनी राज्यातील परिस्थिती बाबत चर्चा केल्याचे कळत आहे.