Special Report | आता ठरलं? सुप्रिया सुळेच राष्ट्रवादीच्या अध्यक्ष?
शरद पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांचे राजीनामे दिले आहेत. ते त्यांचा निर्णय मागे घेतील अशी अनेकांना आशा आहे. शरद पवार हे अध्यक्ष पद पुन्हा घेण्यास इच्छुक नसल्याने नवा अध्यक्ष कोण याची चर्चा सुरु झाली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा (resignation of president) दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तर दुसऱ्या दिवशी वेग राजकीय घडामोडींना आला असून राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) किंवा प्रफुल्ल पटेल असतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. कारण शरद पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांचे राजीनामे दिले आहेत. ते त्यांचा निर्णय मागे घेतील अशी अनेकांना आशा आहे. शरद पवार हे अध्यक्ष पद पुन्हा घेण्यास इच्छुक नसल्याने नवा अध्यक्ष कोण याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान नव्या अध्यक्षांचा फैसला 5 मे रोजी होणाऱ्या बैठकीत होणार आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट