राष्ट्रवादीच्या नेत्याने थेट शरद पवारांच्या विरोधातच दंड थोपटण्याचा दिला इशारा, काय आहे कारण?

राष्ट्रवादीच्या नेत्याने थेट शरद पवारांच्या विरोधातच दंड थोपटण्याचा दिला इशारा, काय आहे कारण?

| Updated on: May 03, 2023 | 9:21 AM

सांगलीतही महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनाम सुरेश पाटील यांनी दिला. त्यानंतर हे सत्र सुरूच असून शरद पवार यांनी 5 मे पर्यंत राजीनामा मागे घ्यावा.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईत निवृत्तीची घोषणा केल्याने एकच खळबळ उडाली. ही बाब राज्यासह देशाच्या कानाकोपाऱ्यात पसरली. तर साहेबांनी निवृत्तीची घोषणा केल्याने अनेक भावूक झालेले दिसून आले. त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी या कार्यकर्त्याने शरद पवार यांना विनंती केली. याचबरोबर राज्यात दबावतंत्र वाढवत अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजीनामे देम्यास सुरूवात केली आहे. सांगलीतही महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनाम सुरेश पाटील यांनी दिला. त्यानंतर हे सत्र सुरूच असून शरद पवार यांनी 5 मे पर्यंत राजीनामा मागे घ्यावा. राजीनामा मागे न घेतल्यास 6 मे पासून राज्यभर आंदोलन करुन राजीनामा देणार, अशी भूमिका राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर शरद पवार यांच्या या निर्णयानंतर त्यांच्या गोविंदबाग येथील निवासस्थानाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

Published on: May 03, 2023 09:21 AM