नाराजीनाट्यानंतर काका-पुतणे जिल्ह्यांच्या दौऱ्यावर!; नाराजी संपली? अजित पवारांवर काय बोलले शरद पवार?

नाराजीनाट्यानंतर काका-पुतणे जिल्ह्यांच्या दौऱ्यावर!; नाराजी संपली? अजित पवारांवर काय बोलले शरद पवार?

| Updated on: May 08, 2023 | 7:15 AM

मात्र याप्रकरणात अजित पवार यांच्यावरच खापर फोडण्याचा प्रयत्न झाला. राज ठाकरे यांनी शरद पवार यांना राजीनामा द्यायचा होता. मात्र अजित पवार यांच्यामुळेच तो मागे घ्यावा लागला. तर अनेकांनी ते शरद पवार यांच्या पत्रकारपरिषदेमध्ये उपस्थित नव्हते त्यावरून निशाना साधत ते नाराज असल्याचे म्हटलं होतं.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर मुंबईसह राज्यातील राष्ट्रवादी कार्यकर्ता आणि नेता दोन्ही हबकला. काय झालं हे कोणालाच कळत नव्हतं. त्यामुळे राज्यात बड्या नेत्यांच्या राजीनामा सत्र सुरू झालं होतं. तर शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मनधरणी सुरू होती. आणि अखेर शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला. मात्र याप्रकरणात अजित पवार यांच्यावरच खापर फोडण्याचा प्रयत्न झाला. राज ठाकरे यांनी शरद पवार यांना राजीनामा द्यायचा होता. मात्र अजित पवार यांच्यामुळेच तो मागे घ्यावा लागला. तर अनेकांनी ते शरद पवार यांच्या पत्रकारपरिषदेमध्ये उपस्थित नव्हते त्यावरून निशाना साधत ते नाराज असल्याचे म्हटलं होतं. तर ते दिल्लीला गेले अशा अफवा ही पसरल्या होत्या. त्यानंतर आता शरद पवार यांनीच त्यावर खुलासा करताना अजित पवार याचं तोंडभरून कौतूक केलं आहे. शरद पवार यांच्या नाराजीनाट्यानंतर शरद पवार आणि अजित पवार हे दौऱ्यावर गेले आहेत. शरद पवार हे बारामती, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत तर अजित पवार हे बारामती, पुणे, सातारा, उस्मानाबाद, लातूर आणि नाशिकच्या दौऱ्यावर. त्यामुळे या काका पुतण्याचं चाललयं तरी काय असा सवाल आता अनेकांच्या मनात पडला आहे. त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट

Published on: May 08, 2023 07:15 AM