पवारांच्या राजीनाम्यावर राऊत, फडणवीस आणि पटोलेंची प्रतिक्रिया; काय नेत्यांची मन की बात?

पवारांच्या राजीनाम्यावर राऊत, फडणवीस आणि पटोलेंची प्रतिक्रिया; काय नेत्यांची मन की बात?

| Updated on: May 03, 2023 | 9:43 AM

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पवारांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण दिलं. गलिच्छ राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांना कंटाळून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा करत आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितलं. त्यानंतर राज्याच्या राजकारणासह देशातही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पवारांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण दिलं. गलिच्छ राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांना कंटाळून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे… पण शिवसैनिकांच्या प्रेमापोटी त्यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला. बाळासाहेबांप्रमाणेच पवारसाहेबही राज्याच्या राजकारणाचा आत्मा आहेत… असे राऊत यांनी म्हटलं आहे. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया देताना हा राष्ट्रवादीचा अंतर्गत मामला आहे आणि भाजप सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. याप्रकरणी काहीही बोलणे घाईचे ठरेल, असे ते म्हणाले. दरम्यान, आता यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले, नेमक्या कोणत्या कारणांमुळे त्यांनी राजीनामा दिला आहे हे सांगणं अवघड आहे. तर तो त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय असल्याचे ते म्हणाले.

Published on: May 03, 2023 09:43 AM