‘रूपाली चाकणकरांचा दौरा म्हणजे नौटंकी’, बदलापूर घटनेच्या तपासाचा आढावा अन् नंतर मेंहदी?

| Updated on: Aug 25, 2024 | 10:33 AM

दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी रूपाली चाकणकर या बदलापूर येथे आल्यात. त्यानंतर त्या बदलापूर येथून उल्हासनगरच्या एका कार्यक्रमात गेल्या. तिथे त्यांनी मेंहदीही काढली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने काय केली रूपाली चाकणकर यांच्यावर टीका?

Follow us on

बदलापूर घटनेच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर बदलापूर येथे आल्यात. मात्र तेथून निघाल्यानंतर त्यांनी उल्हासनगरच्या एका कार्यक्रमात मेंहदी काढली. यावरून रुपाली चाकणकर यांच्यावर टीका होत आहेत. तर सिंधी कार्यक्रमात महिलांच्या आग्रहास्तव मेंहदी काढल्याचं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. मात्र नौंटकी अशी टीका करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने रुपाली चाकणकर यांना संवेदनशीलता नसल्याचे म्हटलंय. बदलापूरहून निघताना मेहंदी लावण्यावरून रूपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलंय. मला सिंधी समाजाच्या महिलांनी कार्यक्रमाला बोलावलं होतं. मात्र मी बदलापूरची घटना घडल्यामुळे पहिल्या दिवशी गेली नाही. महिलांच्या आग्रहामुळे मी कार्यक्रमला गेले होते आणि आग्रह असल्यामुळेच मी मेंहदी काढली, ती त्यांची परंपरा आहे, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या. तर सिंधी समाजाने २० दिवसांपूर्वीच रूपाली चाकणकरांना निमंत्रण दिलं होतं, असं सिंधी समाजाकडून सांगण्यात आलं.