काही दिवसांपुर्वी विखारी टीका अन् आज कानात कुजबूज! काय सुरू आहे शरद पवार आणि शहाजीबापू पाटील यांच्यात?

काही दिवसांपुर्वी विखारी टीका अन् आज कानात कुजबूज! काय सुरू आहे शरद पवार आणि शहाजीबापू पाटील यांच्यात?

| Updated on: May 08, 2023 | 11:39 AM

शरद‎ पवार यांनी सांगोल्यात बाबूरावजी गायकवाड यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त माझी वाटचाल या आत्मचरित्र आणि गौरव ग्रंथाच्या प्रकाशन व सत्कार समारंभाला उपस्थिती लावली.

सांगोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद‎ पवार हे अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर‎ प्रथमच सोलापूर दौऱ्यावर आहेत. या‎ दौऱ्यात ते सांगोला, पंढरपूर आणि सोलापूर‎ शहरात विविध कार्यक्रमांना हजेरी‎ लावणार आहेत. तर आज शरद‎ पवार यांनी सांगोल्यात बाबूरावजी गायकवाड यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त माझी वाटचाल या आत्मचरित्र आणि गौरव ग्रंथाच्या प्रकाशन व सत्कार समारंभाला उपस्थिती लावली. हा कार्यक्रम गौरव ग्रंथाच्या प्रकाशनाचा असलातरिही अनेकांने आश्चर्य व्यक्त केलं. कारण या कार्यक्रमाच्या मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार शहाजीबापू पाटील होते. तर त्यांची शरद पवार यांच्याबरोबर काही कुजबूज सुरू होती. त्यावरून राजकीय चर्चांना उधान आलं आहे. याच्याआधी शहाजीबापू पाटील यांनी शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली होती. त्यांनी शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. ते गेली 45 वर्षे माझे पालक होते. मात्र, त्यांचा इतिहास पाहिला तर त्यांनी सोबत आलेल्या लोकांना आणि पक्षांना हळू हळू संपवले आहे. शिवसेनेला ते कधीही मोठे होऊ देणार नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी सर्वांत जास्त शिवसेनेवर टीका केली आहे. यामुळे शरद पवार कधी गोड बोलून गळा दाबतील हे सांगता येणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे. त्यामुळे मंचावर शहाजीबापू पाटील असल्याने शरद पवार आणि शहाजीबापू पाटील यांच्यात काय सुरू आहे असा सवाल अनेकांच्या मनात येत आहे.

Published on: May 08, 2023 11:39 AM