शरद पवार यांनी भर पावसातील सभेचं श्रेय कुणाला दिलं? दिलखुलास मुलाखतीत शरद पवारांनी सांगितलं…
VIDEO | भर पावसातील सभेसंदर्भात शरद पवार यांनी ऐकवला भन्नाट किस्सा, बघा काय म्हणाले शरद पवार
बारामती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान घेतलेली सभा अजूनही चर्चेत आहे. शरद पवार यांचं भाषण सुरू असताना मुसळधार पाऊस कोसळलेला मात्र तरीही स्टेजवरून शरद पवार हलले ना समोर उभे असलेले हजारो प्रेक्षक. ऐकताना पावसाचा अडथळा येऊ नये म्हणून लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या. पण भाषण संपेपर्यंत कुणीही जागचं हललं नाही. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजही या सभेची नोंद आहे. आज एका मुलाखतीच्या निमित्ताने शरद पवार यांची ही गाजलेली सभा पुन्हा चर्चेत आली. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या तारांगण युवा महोत्सवात विद्यार्थ्यांनी शरद पवार यांना अनेक सामाजिक आणि राजकीय प्रसंगांवर आधारीत प्रश्न विचारले आणि शरद पवार यांनीही दिलखुलास उत्तरं दिली. यावेळी शरद पवार यांनी भर पावसातील सभेचा किस्सा उपस्थितांना सांगितला. बघा काय ऐकावला किस्सा…