राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राज्याच्या विधानसभांचा निकाल लागून १२ दिवसानंतर सरकार स्थापन झाले आहे. मात्र मंत्री मंडळाचे खातेवाटपात अजूनही संभ्रमावस्था कायम आहे. राज्यातील महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीत कोणाला मंत्रीपद द्यायचे त्याचे अधिकार अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देण्यात आले आहेत. मात्र भाजपाच्या यादीवर अद्याप एकमत झालेले नाही अशी माहिती उघड झाली आहे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूकांचा निकाल २३ नोव्हेंबरला लागला त्यानंतर तब्बल १२ दिवसांनी सरकार स्थापण करायला लागले. मात्र सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे शपथविधी झाला आहे. परंतू महायुतीतील खाती वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ अजून सुरुच आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमु्ख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीतच ठाण मांडून आहेत.फडणवीस यांनी काल दिल्लीत सर्व नेत्यांची भेट घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील फडणवीस यांनी भेट घेतली आहे.१४ डिसेंबरला जो शपथविधी पार पडणार आहे त्याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. कारण भाजपाच्या २० जणांपैकी सहा नावांवर अजूनही खल सुरु असल्याचे समजते. उद्या किंवा परवा यावर तोडगा निघाला तरच १४ तारखेला राजभवनात शपथविधी होणार आहे असे म्हटले जात आहे.

'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका

कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा

'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट

2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
