Anil Bonde | ‘संतांच्या दारी राष्ट्रवादीनं राजकारण करु नये’-tv9
तो काही भाजपचा कार्यक्रम नव्हता, तो संताचा कार्यक्रम होता. तर प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे.
मुंबई : नुकताच राज्यसभेच्या निवडणूका पार पडल्या. यात महाविकास आघाडीला झटका बसला. त्यानंतर आता पहिला पंतप्रधान मोदी यांचा दौरा. यातही राजकारण झाल्याचे बोलले जात आहे. आणि यामागे भाजपचे (BJP) कारस्थान असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) सांगितलं जात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहु येथे जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या शीळा मंदिराचे लोकार्पण पार पडलेलं आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले मात्र उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister and Guardian Minister of Pune Ajit Pawar) यांना संधी देण्यात आली नाही. त्यावरून आता मोठ्या प्रमाणात वाद उसळला आहे. तर आरोप-प्रत्यारोप होत आहे. याचदरम्यान संतांच्या दारी राष्ट्रवादीनं राजकारण करु नये खा अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे. तसेच तो काही भाजपचा कार्यक्रम नव्हता, तो संताचा कार्यक्रम होता. तर प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याचे काम राष्ट्रवादी करत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर जेंव्हा पंतप्रधानांनी भाषण करण्यासाठी बोलवलं तेव्हा अजित पवार यांनी वेळ महत्वाचं म्हणत मोठे मन करून आदराने ते नाही म्हणाले.