ईडी चौकशीवर अजित पवार यांनी केलं मोठं वक्तव्य; म्हणाले ‘फक्त जयंत पाटील यांनाचं….’
यावेळी चौकशीच्या विचारणेसाठी सर्व नेत्यांचे आपल्याला फोन आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. कुणाचं एकाचं नाव राहिलं, तर चूक होईल. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख नेत्यांचे फोन आले असं मी सांगितलं. पण अजित पवार यांचा फोन आला नाही असे म्हणाले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी ईडीकडून तब्बल साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. यावेळी चौकशीच्या विचारणेसाठी सर्व नेत्यांचे आपल्याला फोन आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. कुणाचं एकाचं नाव राहिलं, तर चूक होईल. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख नेत्यांचे फोन आले असं मी सांगितलं. पण अजित पवार यांचा फोन आला नाही असे म्हणाले. त्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात नाराजी असल्याचा सुर येत आहे. यावरून अजित पवार यांनी आपले मौन सोडलं आहे. त्यांनी यावर बोलताना, जयंत रावांना काही एकट्यालाच तिथे बोलावलेलं नाही. याच्याआधी छगन भुजबळ, अनिल देशमुख आणि प्रफुल्ल पटेल यांचीही चौकशी झाली आहे. त्यावेळचे माझे स्टेटमेंट दाखवा. मी यावर बोलत नाही. याच्याआधी माझ्यावरच इन्कम टॅक्स विभागाने धाडी टाकल्या त्यावेळी मी बोललो आणि पुढे गेलो. त्यामुळे आता फोन बिन करण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटूनच बोलणार आहे.