ईडीच्या नोटीसवर भाजप नेत्याचा जयंत पाटील यांना सल्ला, म्हणाले, बाऊ...

ईडीच्या नोटीसवर भाजप नेत्याचा जयंत पाटील यांना सल्ला, म्हणाले, बाऊ…

| Updated on: May 11, 2023 | 10:38 AM

जयंत पाटील यांना जाणीवपूर्वक ही नोटीस बजावण्यात आली आहे अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रंगली आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावरून जयंत पाटील यांनी सल्ला वजा टोला लगावला आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीची नोटीस आली आहे. आयएल अँड एफएस प्रकरणात पडताळणीसाठी ईडीने (ED) त्यांना नोटीस बजावली आहे. ईडीने पाटील यांना सोमवारी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यावरून विविध चर्चा रंगल्या आहेत. जयंत पाटील यांना जाणीवपूर्वक ही नोटीस बजावण्यात आली आहे अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रंगली आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावरून जयंत पाटील यांनी सल्ला वजा टोला लगावला आहे. बावनकुळे यांनी, ईडीची नोटीस आली असेल तर जयंत पाटील यांनी बाजू मांडली पाहिजे. ईडीला स्पष्टीकरण दिले पाहिजे. तथ्य नसेल तर घाबरू नये. त्याचा बाऊ करू नये, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

Published on: May 11, 2023 10:38 AM