ईडी चौकशी भाजपचा हात? जयंत पाटील म्हणाले, ”यावर अत्ता भाष्य… माझा संबंध…”
जयंत पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना भाजपला इशारा दिला आहे. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, मला नोटीस आली आहे. नोटीसमध्ये काही कारण सांगितलेलं नाही.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. कारवाईविरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहेत. मुंबईत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर मोठी घोषणाबाजी करण्यात येत आहे. जयंत पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना भाजपला इशारा दिला आहे. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, मला नोटीस आली आहे. नोटीसमध्ये काही कारण सांगितलेलं नाही. पण त्याचा फाईल नंबर काढून बघितला तर असं दिसतंय की आयएफएससी नावाची कुठली तरी संस्था आहे आणि त्या संबंधात मला माहिती नाही. त्याच्याशी आपला काही संबंध नाही. पण यात भाजपचा हात आहे या प्रश्नावर त्यांनी ही वेळ त्यावर बोलण्याची नाही. मी योग्य वेळ आल्यावर याचं उत्तर देईन अस म्हटलं आहे. तर तसेच ईडी चौकशीला हजर होण्यापूर्वी जयंत पाटील यांनी ट्वीट करून मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कोणीही मुंबईला येऊ नये, अशी विनंतीही केली होती.