Maharashtra Politics : जयंत पाटील यांना आठवड्याची मुदत, दुसऱ्यांदा नोटीस; काय आहे प्रकरण?
यापुर्वी पाठवण्यात आलेल्या नोटीशीवर जयंत पाटील यांनी अद्याप अशी कोणती नोटी मिळाली नसल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यावेळी त्यांनी ईडीकडे आपल्या लग्नाचा वाढदिवस आणि इतर काही कार्यक्रमांच्या उपस्थितीवरून वेळ मागितला होता.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. जयंत पाटील यांना सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचदरम्यान त्यांना आता दुसरी नोटीस देण्यात आली आहे. ज्यात त्यांना चौकशीला 22 मे ला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापुर्वी पाठवण्यात आलेल्या नोटीशीवर जयंत पाटील यांनी अद्याप अशी कोणती नोटी मिळाली नसल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यावेळी त्यांनी ईडीकडे आपल्या लग्नाचा वाढदिवस आणि इतर काही कार्यक्रमांच्या उपस्थितीवरून वेळ मागितला होता. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. तर याचप्रकरणी 2018 मध्ये याचप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. तर जयंत पाटील यांना ईडीने दुसऱ्यांदा नोटीस काढत ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ते 22 तारखेल चौकशीसाठी हजर राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.