हा तर सेंट्रल एजन्सीचा गैरवापर; जयंत पाटलांचा सोमय्यांवर पलटवार
हसन मुश्रीफांवर होत असलेली कारवाई चुकीची असल्याचे समर्थक म्हणत आहेत. तर त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे एका विचारधारेच्या विरोधात आहेत. त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून धाडी टाकल्या जात आहेत.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तेवर ईडीने छापेमारी केली. विविध ठिकाणी त्यांच्या मालमत्तेवर ईडीच्या पथकाने हे छापे टाकले आहे. त्यावरून कागलमध्ये त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. तर कागल बंदची हाक देखील देण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हसन मुश्रीफांवर होत असलेली कारवाई चुकीची असल्याचे समर्थक म्हणत आहेत. तर त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे एका विचारधारेच्या विरोधात आहेत. त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून धाडी टाकल्या जात आहेत.
याच्याआधीही हसन मुश्रीफांवर यांना तुरुंगात टाकण्याची भाषा भाजपच्या लोकांनी केली होती. हसन मुश्रीफ हे लढावय्ये नेते आहेत, संघर्ष करणारे नेते आहे, संकटाशी सामना करणारे नेते आहे, आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत.
याच्यानंतर आता जयंत पाटील यांनी देखिल सोमय्यांसह भाजपवर निशाना साधला आहे. तसेच यापूर्वी त्यांच्यावर आयटीचा छापा झाला होता. त्याला बराच काळ होऊन गेला.
आता नव्याने छापेमारी सुरू करून एखाद्याच्या मागे सरकार कसं लागतंय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. सततच्या कारवाई करणे आणि एखाद्याला बदनाम केलं जात आहे. कारण काय तर तो राजकीय दृष्ट्या तुमच्या पेक्षा वेगळी मते मांडतो. हा सेंट्रल एजन्सीचा गैरवापर असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे