'ईडीची धाड धक्कादायक'- जयंत पाटील

‘ईडीची धाड धक्कादायक’- जयंत पाटील

| Updated on: Mar 11, 2023 | 9:54 AM

ईडीकडून पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्यावर छापा टाकण्यात आल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त करत हे अत्यंत धक्कादायक असल्याचे म्हटलं आहे

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर पुन्हा एकदा ईडीने धाड टाकली. गेल्या दिड महिन्यात ईडीने दुसऱ्यांदा धाड टाकल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याच्या आधी मुंबई उच्च न्यायालयाने मुश्रीफ यांच्यावर 24 एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नये असा आदेश दिला होता. त्यानंतर ही ईडीकडून पुन्हा एकदा छापा टाकण्यात आल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त करत हे अत्यंत धक्कादायक असल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने सुनावणी वेळी आपले स्पष्ट मत मांडले आहे. ज्यातून केंद्रीय तपास यंत्रणांचा एजन्सीचा गैरवापर सुरू आहे. या यंत्रणा सरकारला मदत करत असल्याचेच समोर येत आहे असेही ते म्हणाले.

Published on: Mar 11, 2023 09:54 AM