‘त्या’ दाव्यावरून भाजप नेत्यानं राऊत यांचा घेतला खरपूस समाचार; म्हणाला, ”भाकरी…”
सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापलेलं आहे. अशातच ठाकरे गटाचा मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेख सामनातून टीका करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी भाजपची गुलामी पत्करायचे नाकारले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून तब्बल साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. यावरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापलेलं आहे. अशातच ठाकरे गटाचा मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेख सामनातून टीका करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी भाजपची गुलामी पत्करायचे नाकारले. त्यामुळे त्यांना लगेच ईडीचं बोलावणं आलं. पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावं असा त्यांच्या वर दबाव होता. एखाद्याला त्रास द्यायचा म्हटला की सभ्यता गुंडाळून ठेवली जाते असे सामनातून म्हटले आहे. याच विधानावरून भाजप नेते केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. केशव उपाध्ये यांनी भाकरी एकाची आणि चाकरीचा एकाची हा फार्म्युला राऊत यांचा असल्याचं म्हणत घणाघात केला आहे.
Published on: May 24, 2023 01:20 PM
Latest Videos