नरहरी झिरवळ यांच्या त्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं वक्तव्य; म्हणाले, ''कोणी कितीही विधान''

नरहरी झिरवळ यांच्या त्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं वक्तव्य; म्हणाले, ”कोणी कितीही विधान”

| Updated on: Jun 05, 2023 | 11:33 AM

याचदरम्यान यावर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीये. नरहरी झिरवळ हे आमचे पक्षाचे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केलं. पण त्याच्याबद्दल वेगळं मत व्यक्त करणे योग्य आहे का? असा सवाल त्यांनी केला.

अहमदनगर : विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं वक्तव्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केलं. त्यांनी हे वक्तव्य नाशिकमध्ये शेतकरी कृतज्ञता मेळव्यात केलं होतं. त्यावरून सध्या राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे. याचदरम्यान यावर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीये. नरहरी झिरवळ हे आमचे पक्षाचे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केलं. पण त्याच्याबद्दल वेगळं मत व्यक्त करणे योग्य आहे का? असा सवाल त्यांनी केला. तर आम्हा सर्वांना जाणीव आहे संख्या आल्याशिवाय तिथपर्यंत आम्ही पोहोचणार नाही. असं मत त्यांनी व्यक्त केलय. तसेच कोणी कितीही विधान केली आमच्यामध्ये सर्वांना जाणीव आहे येणाऱ्या लोकसभेत चांगला परफॉर्मन्स दाखवायचा परफॉर्मवर चांगलं दाखवल्यानंतर शरद पवार साहेब जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी होणार असा जयंत पाटील यांनी म्हटलय. तर आमच्यात कुठलेही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलय.

Published on: Jun 05, 2023 11:33 AM