सत्तांतरात केलेल्या मदतीच्या बदल्यात भीमाशंकर आसामला देऊन आलात?; राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचा सवाल

सत्तांतरात केलेल्या मदतीच्या बदल्यात भीमाशंकर आसामला देऊन आलात?; राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचा सवाल

| Updated on: Feb 15, 2023 | 7:46 AM

खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ज्योतिर्लिंगच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला लक्ष केलंय. पाहा...

मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ज्योतिर्लिंगच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला लक्ष केलंय. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. “श्री शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातील ‘भीमाशंकर’ जि. पुणे, हे ज्योतिर्लिंग ओळखले जाते.अतिशय निसर्गरम्य परिसरात वसलेले हे शिवालय अगणित भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पण भाजपाची सत्ता असणाऱ्या आसाम राज्याने गुवाहाटीजवळ असणारे पामोही येथील शिवलिंग सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा प्रचार सुरूय केला आहे. हा अतिशय खोडसाळ आणि तथ्यहीन प्रसार आहे. घटनाबाह्य ED सरकार-आपण गुवाहाटीला आमदारांची फौज पळवून नेली होती.तिथं तुमची सर्व सोय अदृश्य शक्तीच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती.त्याचवेळी तुम्ही बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना?अर्थात अशी शक्यता नाकारता येत नाही”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

Published on: Feb 15, 2023 07:46 AM