राष्ट्रवादी पालिका निवडणुका स्वबळावर लढणार ?, अजित पवार कार्यकर्त्यांना काय म्हणाले?
येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये महापालिका निवडणुकांचा देखील समावेश आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सूचक वक्तव्य केल्याचं पहायला मिळत आहे.
सातारा : येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये महापालिका निवडणुकांचा देखील समावेश आहे. राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सूचक वक्तव्य केल्याचं पहायला मिळत आहे. आगामी पालिका निडणुका (election) स्वबळार लढण्यासाठी कामाला लागा, असे आदेश अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. ते साताऱ्यामध्ये सभेत बोलत होते. आघाडी कोणासोबत करायची? करायची की नाही याबाबत सर्व निर्णय राज्यपातळीवर होतील. मात्र तुम्ही आम्हाला आघाडीबाबत विचारत बसू नका, तर निवडणुका स्वबळावरच होणार आहेत असे समजून कामाला लागा. असे आदेश अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून देखील अनेकवेळा स्वबळाचे संकेत देण्यात आले आहेत.