ठाकरे गटाला दे धक्का; नीलम गोऱ्हे उपसभापतीपदी कायम, तालिका सभापतींचा निर्णय!
नीलम गोर्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना विधान परिषदेच्या उपसभापती पदावरून हटवण्याची मागणी केली होती. अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. मात्र ठाकरे गटाला मोठा धक्का देत नीलम गोर्हे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई, 21 जुलै 2023| नीलम गोर्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना विधान परिषदेच्या उपसभापती पदावरून हटवण्याची मागणी केली होती. अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. मात्र ठाकरे गटाला मोठा धक्का देत नीलम गोर्हे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विधानसभेच्या उपसभापतीपदावर नीलम गोऱ्हे कायम राहणार आहेत. 10 व्या शेड्युलनुसार उपसभापतींवर अशी कारवाई करता येणार नाही. तसंच अजूनही त्या शिवसेना पक्षातच असल्याने, गोर्हे यांना अपात्र ठरवता येणार नाही, असा निर्णय तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी दिलाय.
Published on: Jul 21, 2023 09:27 AM
Latest Videos