Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट, 81 दिवसांनी दिलासादायक बातमी

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट, 81 दिवसांनी दिलासादायक बातमी

| Updated on: Jun 20, 2021 | 11:04 AM

नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 81 दिवसात पहिल्यांदाच नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 60 हजारांच्या खाली गेला. कालच्या दिवसात 58 हजार 419 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 576 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. (New 58419 Corona Cases in India in the last 24 hours)