जगबुडी नदीवरील पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर एक लेनची वाहतूक बंद

जगबुडी नदीवरील पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर एक लेनची वाहतूक बंद

| Updated on: Jul 21, 2024 | 8:10 PM

जगबुडी नदीला प्रचंड पुर आला आहे. त्यामुळे रत्नागिरीतील खेड येथील पुलाला तडा गेलेला आहे. या घटनेचे वृत्त टीव्ही 9 मराठी वाहीनीने दिल्यानंतर या पुलावरील एक लेन बंद केली आहे.

कोकणातील मुंबई ते गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरील पुलाला तडे गेल्याची बातमी टीव्ही 9 मराठीने दाखविली आणि त्यानंतर खळबळ उडाली. प्रशासनाने नंतर हा पुल वाहतूकीसाठी बंद करीत ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे सर्व नद्यांना पुर आला आहे. त्यातच रत्नागिरीतील खेड येथील जगबुडी नदीला प्रचंड पुर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबई – गोवा महामार्गावर जगबुडी पुलाला तडा गेला आहे. टीव्ही मराठी लाईनच्या बातमीनंतर या पुलाची एक मार्गिका बंद करण्यात आली आहे. जगबुडी नदीवरील पुलावरुनच एसटी महामंडळाची बस बुडाल्याने काही वर्षापूर्वी अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या नंतर जगबुडी नदीवर नवा पुल बांधण्यात आला होता. परंतू आता त्यालाही तडा गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Published on: Jul 21, 2024 08:08 PM