नवी इमारत, नवी आसन व्यवस्था, कसे असेल नवे संसद भवन, पहा पहिली झलक
पहिले सत्र सकाळी 7.30 ते 9.30 पर्यंत चालणार आहे. तर उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा दुसरा टप्पा दुपारी 12 ते 2.30 वाजेपर्यंत चालणार आहे. नवीन संसद भवनाचे बांधकाम सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचाच एक भाग आहे. या नव्या संसद भवनाची ही एक झलक...
नवी दिल्ली : 28 मे रोजी नवी दिल्ली येथे नव्या संसद भवनाचे उदघाटन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. नव्या संसद भवनाचे उदघाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. तसेच, राष्ट्रपती यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उदघाटन होणार नसल्याने उदघाटन कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. जवळपास 19 विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. तर 25 पक्ष या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा उद्घाटन सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी केंद्र सरकारची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. उद्घाटनाचा कार्यक्रम दोन सत्रात होणार असून पहिले सत्र सकाळी 7.30 ते 9.30 पर्यंत चालणार आहे. तर उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा दुसरा टप्पा दुपारी 12 ते 2.30 वाजेपर्यंत चालणार आहे. नवीन संसद भवनाचे बांधकाम सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचाच एक भाग आहे. या नव्या संसद भवनाची ही एक झलक…