पंतप्रधान Narendra Modi यांची 'परीक्षा पे चर्चा

पंतप्रधान Narendra Modi यांची ‘परीक्षा पे चर्चा

| Updated on: Apr 01, 2022 | 1:17 PM

नवी दिल्ली येथे आयोजित परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात देशातील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली.

सध्या डिजिटल क्रांतीमुळे (Digital Revolution) ऑनलाइन (Online Exam) पद्धतीने शिक्षण घेण्याचे युग आहे. मात्र शिकण्यासाठी मोबाइल किंवा लॅपटॉप घेतला की युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम यासारखे हजारो डिस्टर्बन्स येतात. या सगळ्यांमुळे मन विचलित होतं आणि अभ्यासावर कमी लक्ष जातं. अशा अडथळ्यानंतरही अभ्यासावर कसं लक्ष केंद्रित करायचं, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना विचारण्यात आला. नवी दिल्ली येथे आयोजित परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात देशातील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. ऑनलाइनच्या जमान्यात येणाऱ्या हजारो अडथळ्यांवर कशी मात करायची याचं उत्तरही त्यांनी अगदी सविस्तर पणे दिलं.

Published on: Apr 01, 2022 01:17 PM