“चर्चगेट वसतिगृहातील हत्या प्रकरणात नवी माहिती उघड”, आरोपी पाईपलाईने…
महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई मुली आणि महिलांसाठी सुरक्षित शहर मानलं जातं. पण मुंबईच्या अतिशय हायप्रोफाईल आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरातील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका 19 वर्षीय विद्यार्थीनीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई मुली आणि महिलांसाठी सुरक्षित शहर मानलं जातं. पण मुंबईच्या अतिशय हायप्रोफाईल आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरातील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका 19 वर्षीय विद्यार्थीनीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. संबंधित मृत तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला होता. यानंतर आरोपीचा मृतदेह रात्री उशीरा चर्नीरोड- ग्रान्डरोड स्थानकांच्या दरम्यान आढळला. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. या आरोपीचे नाव ओमप्रकाश कनोजिया आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी नवी माहिती उघड झाली आहे. ज्यादिवशी या पीडितेची हत्या करण्यात आली होती, त्यादिवशी आरोपी गेट बंद असल्याने पाईपलाईनवरून हॉस्टेलमध्ये शिरला होता, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
Published on: Jun 08, 2023 04:11 PM
Latest Videos