100 Super Fast News | ठाकरे गट दोन दिवसात सुप्रीम कोर्टामध्ये जोडपत्र सादर करणार

100 Super Fast News | ठाकरे गट दोन दिवसात सुप्रीम कोर्टामध्ये जोडपत्र सादर करणार

| Updated on: Mar 11, 2023 | 9:33 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यामधून बाहेर पडत असताना ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

मुंबई : उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्ष अजून मिटलेला नाही. आता उद्धव ठाकरे गट 16 आमदारांच्या अपातर्फेबाबत राहिलेले मुद्दे जोडपत्रातून सुप्रीम कोर्टामध्ये मांडणार आहे. त्यामुळे काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यामधून बाहेर पडत असताना ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यादरम्यान अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईवर परब यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांची खेड तेथे झालेल्या सभेचा परिणाम हा कदम यांच्या कारवाईतून दिसून येत आहे. तसेच आपले कुठलेही अनधिकृत बांधकाम केले नसताना किरिट सोमय्या यांनी प्रतिमा मलिन केली असा आरोप अनिल परब यांनी केला आहे. तर परब यांनी सोमय्यांविरोधात हक्क भंग ही मांडलेला आहे.

Published on: Mar 11, 2023 09:33 AM