SuperFast News | ते फक्त मातोश्रीचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे नाही; राणे यांची ठाकरेंवर टीका
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधताना, ठाकरे आता संपले आहेत. ते फक्त मातोश्रीचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे नाही असे म्हटलं आहे.
SuperFast News | राज्यातील तत्कालिन महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी तोडफोडीचे राजकारण झालं. तर देवेंद्र फडणवीस हे वेशभूषा करून जायचं असा खुलासा अमृता फडणवीस यांनी केला. यावरूनच अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी तानाजी सावंत हे बैठकांची कबुली देतात. त्यामुळे मविआचे कशा पद्धतीचे राजकारण करून पाडलं गेलं हे समोर येत असल्याचं म्हटलं आहे. तर महाविकास आघाडी पाडण्यासाठी आपण 100 ते 150 सभा घेतल्याचे तानाजी सावंत यांनी म्हटलं होतं. त्यावरून ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी, मीच मुख्यमंत्रीपदाचा खराब दावेदार आहे असं सावंत यांना सांगायचं असेल असा टोला लगावला आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधताना, ठाकरे आता संपले आहेत. ते फक्त मातोश्रीचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे नाही असे म्हटलं आहे.