36 Jilhe 50 Batmya | महाराष्ट्र केसरीचा थरार, आज कळणार कोण मारणार बाजी?
आज मैदान मारणाऱ्या महिलेला पहिल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची चांदीची गदा मिळणार
36 जिल्हे 50 बातम्या | सांगलीमध्ये महिलांच्या पहिल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी आज. आज कळणार कोण मारणार बाजी. तर आज मैदान मारणाऱ्या महिलेला पहिल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची चांदीची गदा मिळणार. एकीकडे स्पर्धेचा गाजावाजा असतानाच स्ट्रीट लाईट, जेवणासाठी आसन आणि पाण्याची व्यवस्था नसल्याने स्पर्धांमध्ये नाराजीचा सुर. तर राज्यात आजपासून पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठवाडा, उत्तर-मध्य महाराष्ट्र, सोलापूर, धुळे, नाशिक, नंदुरबार आणि विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याची माहिती विभागाने दिली आहे. संत तुकाराम महाराजांच्या देहूमध्ये रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक जोमात आलं असून काठीलाही वेग आला आहे. अवकाळीमध्ये देखील ज्वारीचं पीक धरून उभं राहिल्यानं बळीराजा खूश आहे. सध्या शेतकऱ्यांची ज्वारी काढण्याची लगबग सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतकरी अवकाळी पाऊस आणि गारपीटी मुळे चांगलाच हैराण झाला असतानाच आता मजूर नसल्याने दुहेरी संकटात सापडला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यासह अन्य महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 50 बातम्यांमध्ये