36 Jilhe 50 Batmya | राज्यात 9 एप्रिलपर्यंत अवकाळीसह गारपीटीची शक्यता
हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. यावेळी 6,7 आणि 8 तारखेला विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी सह गारपीटीचं संकंट येण्याची शक्यता आहे. राज्यात 9 एप्रिलपर्यंत अवकाळीसह गारपीटीची शक्यता आहे. तर नांदेड, लातूर, उस्मानाबादमध्ये पुढील काही तासातच मेघकर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. यावेळी 6,7 आणि 8 तारखेला विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून एका दिवसात 803 नव्या रूग्णांची नोंद झाली. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात देखील कोरोना रुग्ण वाढण्याचे संकेत देण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचा आवाहन करण्यात आले आहे.
Published on: Apr 07, 2023 09:52 AM
Latest Videos