Super Fast News | वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव केला नाही; महंत सुधीर दास यांचे स्पष्टीकरण

Super Fast News | वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव केला नाही; महंत सुधीर दास यांचे स्पष्टीकरण

| Updated on: Apr 01, 2023 | 8:44 AM

मंदिरातील महंतांनी वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव केला नाही असे स्पष्टीकरण महंत सुधीर दास महाराज यांनी दिलं आहे

Super Fast News | माजी खासदार संभाजी छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार ऐतिहासिक काळाराम मंदिरातच प्रकार घडला. त्यानंतर याप्रकरणावरून सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात टीका होताना दिसत आहे. त्यानंतर मंदिरातील महंतांनी वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव केला नाही असे स्पष्टीकरण महंत सुधीर दास महाराज यांनी दिलं आहे. तर कोणत्याही पूजेची सुरुवात संकल्पनेतून होते काही गैरसमज झाले असतील तर ते मनातून काढून टाकावे असे आवाहन महंत अनिकेत शास्त्री यांनी केले आहे. तर बारामतीतील सुपे येथे भर चौकात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. येथील महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. तर दरोडेखोरांनी दोन गोळ्या झाडल्याने स्थानिक रहिवासी जखमी झाला आहे. यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक होत एका दरोडेखोराला पकडे असून तिघेजण फरार झाले. याचदरम्यान शिर्डीमधील साई संस्थानात साई भक्तांमध्ये हाणामारी झाल्याचे उघड झाले आहे. एका भक्तांना आऊट गेटमधून प्रवेश केल्याने शाब्दिक वादावादी होऊन हाणामारी झाली. त्यानंतर भक्तांच्या तक्रारीवरून सुरक्षा रक्षक विरोधात अ दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. नुकताच खेड येथे महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यती पार पडल्या. यावेळी मात्र या शर्यतीला गालबोट लागले. तुफान दगडफेक करण्यात आली. तर शेवटच्या गाड्यांच्या शर्यतीवेळी आयोजकांनी वेळ चुकीची दाखवल्याचा स्पर्धकांनी आरोप केला.

Published on: Apr 01, 2023 08:44 AM