सुपरफास्ट 50 न्यूज | शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा, शिंदे फडणवीस सरकारचा निषेध
गडचिरोलितील देसाईगंज तालुक्यात शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
सुपरफास्ट 50 न्यूज | मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना रमजान सुरू झाल्याने एपीएमसी मार्केटमध्ये उलाढाल वाढली आहे. उपवास सोडण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर फळांची विक्री केली जात आहे. तर नांदेडमध्ये पैनगंगा नदीवर पूल उभारण्याच्या मागणीसाठी तळणी ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. 2019 मध्ये नाबार्ड अंतर्गत पुलाचं काम मंजूर होऊन सुद्धा अद्यापही काम सुरू नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
मालेगावातील सटाणा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या सीमेवर धुळे साखरी शहरांना जोडणाऱ्या रस्त्याचं काम दोन वर्षापासून प्रलंबीत राहिली आहेत. त्यामुळे काम लवकर पूर्ण करा अशी मागणी नागरिकांची आहे. गडचिरोलितील देसाईगंज तालुक्यात शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
तसेच शेतकऱ्यांची वीज तोडू नये यासाठी चक्काजाम आंदोलन करून शिंदे फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. सांगलीची प्रतीक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे. तिने कल्याणच्या वैष्णवी पाटीलवर मात केली. पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरलेल्या बागडीला मानाची चांदीची गदा देण्यात आली.