Super Fast News | सांगलीत खासदार इम्तियाज जलील यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध

Super Fast News | सांगलीत खासदार इम्तियाज जलील यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध

| Updated on: Mar 11, 2023 | 8:38 AM

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या नावाला विरोध केल्याने खासदार इम्तियाज जलील यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला

Super Fast News | राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यानंतर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक काढण्याची लगबग सुरू झाली आहे. कापणी करून ठेवलेल्या हरभरा पिकाचे नुकसान अवकाळीमुळे झाल्याने तर हवामान बदलामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. सांगलीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या नावाला विरोध केल्याने खासदार इम्तियाज जलील यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. परळीमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपच्या कार्यालयात कुणीही दिसून येत नाही असं म्हणत सुषमा अंधारे यांनी टीका केली. मुंबईतील कुर्ला परिसरात पुढचे नऊ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर पुण्यात 13 ते 15 मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Published on: Mar 11, 2023 08:38 AM