मुख्यमंत्री शिंदेच्या सभेला गर्दी होईलच : केसरकर या बातमीसह पहा 25 महत्वाच्या बातम्या
रत्नागिरीतील सभेत संजय जाधव यांनी सात जन्म जरी आले तरिही आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहू असे म्हटलं आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीत जोरदार सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी होती. मात्र या पेक्षा ही अधिकची गर्दी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या १९ तारखेच्या सभेला होईल असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. तर बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे वडील असले तरिही ते त्यांची स्वतःची प्रॉपर्टी नाही. ते या देशाची आणि हिंदू समाजाची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे त्यांचं नाव कुणीही वापरेल असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. तर रत्नागिरीतील सभेत संजय जाधव यांनी सात जन्म जरी आले तरिही आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहू असे म्हटलं आहे. तर या संघर्षांच्या लढाईत सर्व विरोधकांनी निवडणुका एकत्र येऊन लढण्याबाबात काळजी घेऊ असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Published on: Mar 06, 2023 06:43 PM
Latest Videos