Superfast News | चिंताजनक; राज्यातील 2117 रुग्णांपैकी 527 रुग्ण एकट्या पुण्यात
राज्यापाठोपाठ पुण्यातील कोरोना रूग्ण संख्या देखिल वाढताना दिसत आहे. राज्यामध्ये 2117 रुग्ण झाले असून त्या त्यापैकी 527 रुग्ण एकट्या पुण्यात आहेत
Superfast News | कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यांच्या आरोग्य सचिवांची बैठक बोलावली आहे. तर गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1890 रुग्ण झाले आहेत तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यापाठोपाठ पुण्यातील कोरोना रूग्ण संख्या देखिल वाढताना दिसत आहे. राज्यामध्ये 2117 रुग्ण झाले असून त्या त्यापैकी 527 रुग्ण एकट्या पुण्यात आहेत. 1 एप्रिल पासून राज्यात वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. वीज कंपन्यांनी सादर केलेल्या वीजदर निश्चितीच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार. तर मार्चनंतर नवे दर जाहीर होण्याची शक्यता. पुण्यातील मेट्रोवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला आणि भाजपला सुनावल्यानंतर मेट्रोचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. पुण्यातील मेट्रो आता रूबी हॉलपर्यंत धावणार तर पिंपरी ची मेट्रो सिविल कोर्ट इंटरचेंजपर्यंत धावणार आहे. यासह घ्या इतर बातम्यांचा आढावा महत्वांच्या बातम्यांमध्ये