औरंगाबाद नामातंरण वाद पेटला, खासदार इम्तियाज जलील यांचे संसदेचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी, पहा महाफास्ट न्यूज 100
औरंगाबाद नामातंरण वाद पेटला आहे. नामांतरणानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे साखळी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या भूमिकेवरही आता टीका होत आहे.
राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतरण छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आल्यानंतर राज्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर औरंगाबाद नामातंरण वाद पेटला आहे. नामांतरणानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे साखळी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या भूमिकेवरही आता टीका होत आहे. तर त्यांचे असे करणे म्हणजे औरंगजेबच उदात्तीकरण असल्याचे टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत त्यांचे संसदेचं सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी केली आहे. तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि जयस्वाल यांनी औरंगजेबची कबर ही हैद्राबादला हलवण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान यांच्याकडे करणार असल्याचे म्हटलं आहे. यादरम्यान आमदार शिंवेद्रराजे भोसले यांनी औरंगजेबचे पोस्टर उपोषणस्थळी झळकावल्या प्रकरणी संबंधीतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे.
Published on: Mar 06, 2023 05:49 PM
Latest Videos